03 March 2009

राजेंन्द्र

राजेंन्द्र

अजिंक्य तो राजेंन्द्र

ज्याला ना कशाची डर

उलथवूनी पाडेल आक्रमणे ती

करील जो राज्यावरी प्रहार

 

माझा विश्वास त्याचं राजावरी असेल वारंवार

 

अग्नीज्वाळा त्या नेत्री टपकतील शत्रुंसी पाहतां

संशय छेदील शत्रुंचे कुटील डावं दाहतां

रक्षिण्यासी अपुलाली प्रजा जो सतर्क तत्परं थोर

 

माझा विश्वास त्याचं राजावरी असेल वारंवार

 

सेनापती असती अग्रभागी अश्वांसंगे धारधार शस्त्रे घेवून

एकच ध्वनी कडाडता सैन्य धावेल स्फूर्ती होवून

पाहता पाहता ढासळेल शत्रुंचे सर्व शस्त्र प्रहार

 

माझा विश्वास त्याचं राजावरी असेल वारंवार

 

राज्यशास्त्रं अभ्यास अविरत खेळतसे शत्रुंसी पाडण्यां

साम दाम दंड भेद नितींच्या अहोरात्र चाचण्यां

गुप्तहेर ते निपूण असती खबरी देण्यांसी चतुर

 

माझा विश्वास त्याचं राजावरी असेल वारंवार

 

सीमा सर्वही भक्कम असती सर्व आक्रमणे रोखण्यां

दारुगोळा तोफां उभारुनी असती सैन्य फळ्या फोडण्यां

अमुच्या जनतेसाठी असे दयाळू शत्रुंसाठी क्रुरं

 

माझा विश्वास त्याचं राजावरी असेल वारंवार

 

धान्य संपत्ती तुटवडां नसे सर्व प्रजेस आहे अभय

राज्यकारभारी प्रधान मंडळी प्रजा सेवेची सवय

न्यायशास्त्री ते सरळ आहेती न्याय देण्यासी समान

 

माझा विश्वास त्याचं राजावरी असेल वारंवार

वसुंधरा

वसुंधरा

 वसुंधरेच्या तनावरती घावं घालुनीया, मानवा का छळवाद मांडियला,

सुंदर सृष्टी ही सारी, का पापी हृद्ये तुंम्ही, चिरुनी मरणे मार्गीयला,

 

प्रफुल्ल होते प्राणिमात्र, तुंम्ही निसर्ग विस्कटूनी, नर्तन केले तयांचे प्रेते,

जहाल करुनीया कर्मे, तुंम्ही कुमार्ग पत्करुनी, जाळीयले तुमच्याच चित्तें, 

 

गढूळ जाहल्या नियती सार्‍या, कलीयुगीन प्रवृत्त्या, तुंम्हा ना कशाचीच दया,

स्वतःच जाळूनीया, स्वतःच्या अनमोल या देहा, नाही हा पराक्रम राया,

 

उद्दम तुमच्या या क्रौर्‍याने जळेल ही पृथ्वी, अन् तीची सौम्य काया,

हिरवळ जंगले ओसाड होवूनी करपलेले तुकडे, तुंम्हासी राहतील हो खाया,

 

जळूनी जाईल सर्वची भूमी, तेंव्हा का आठवे, तुंम्हासी शांततेचा पाया,

वाळवंटी जहाली धरणी सारी, तेंव्हा का आठवे, तुंम्हासी उदकाची माया,

 

पाया पडितो, विनवितो  तुंम्हा, ऐका वेड्याची या, हि   हितावह गया,

अघटीत घटेल  पुढत्या क्षणी, तेंव्हा  नसेन मी,  अन्  तुमच्यांही  काया.

                        -    प. प्र. आचरेकर