वसुंधरा
सुंदर सृष्टी ही सारी, का पापी हृद्ये तुंम्ही, चिरुनी मरणे मार्गीयला,
प्रफुल्ल होते प्राणिमात्र, तुंम्ही निसर्ग विस्कटूनी, नर्तन केले तयांचे प्रेते,
जहाल करुनीया कर्मे, तुंम्ही कुमार्ग पत्करुनी, जाळीयले तुमच्याच चित्तें,
गढूळ जाहल्या नियती सार्या, कलीयुगीन प्रवृत्त्या, तुंम्हा ना कशाचीच दया,
स्वतःच जाळूनीया, स्वतःच्या अनमोल या देहा, नाही हा पराक्रम राया,
उद्दम तुमच्या या क्रौर्याने जळेल ही पृथ्वी, अन् तीची सौम्य काया,
हिरवळ जंगले ओसाड होवूनी करपलेले तुकडे, तुंम्हासी राहतील हो खाया,
जळूनी जाईल सर्वची भूमी, तेंव्हा का आठवे, तुंम्हासी शांततेचा पाया,
वाळवंटी जहाली धरणी सारी, तेंव्हा का आठवे, तुंम्हासी उदकाची माया,
पाया पडितो, विनवितो तुंम्हा, ऐका वेड्याची या, हि हितावह गया,
अघटीत घटेल पुढत्या क्षणी, तेंव्हा नसेन मी, अन् तुमच्यांही काया.
- प. प्र. आचरेकर
No comments:
Post a Comment