17 February 2009

आंम्हास काय हवे?

 

आंम्हास काय हवे?

 

आंम्हास काय हवे?

लाकूड विटां वगैरे

आधारासं एक छप्परं

वर्षाकाली पत्रे अन्

झाकण्यासी डांबर

 

आंम्हासी नसतो पत्ता

अमुच्याचं भविष्याचां

शाळेवीना लहान पोरं

दिनरातं उनाडक्यां

 

झाले काळेकुट्ट जिवन

अंधारात सर्व दिशां

कामं कोणतेही असो

द्या केवळ एक पैसां

 

आंम्हास काय हवे?

दाणे रेशनिंगचे अन्

ज्वलनासी घासलेटं

प्रातःकाली डब्बें

उघड्यावरी बैसण्यासं

 

काय अमुची संस्कृती?

या पहावयासी जरा

दारू जुगाराचे अड्डे

टपोरी पोरांचा पहारां

 

अन्न पाण्याचा हो

आहे सदाचं जुगारं

दिडदमडीचा हा जीवं

आहे कामांस लाचारं

 

आंम्हास काय हवे?

काम तूटके फुटकें

गिळण्यासी एक घासं

कधी उष्ट्याचाही भातं

रात्रीच्या भोजनासं

 

काही अमुच्यांतलेच असती

जरा आंम्हाहूनी भिन्नं

काबाडकष्टं करोनी

मिळाविती मोठी चिन्हं

 

पण हवा जेव्हा लागे

ते आंम्हा विसरोनी जाती

अमीरांचे हृद्यंशुन्यं

सदा गुण हो गाती

 

आंम्हास काय हवे?

सहकार्य वगैरे

परंतू पैका नको

हव्यात काही संघटना

अमुचे प्रश्नं उचलण्यासं  

-       प. प्र. आचरेकर   

No comments:

Post a Comment