11 February 2009

स्फुर्ती


स्फुर्ती
आहे असाचं मी, 
आहे जसां मी, 

माझ्यां प्रतिभेच्यां ज्वालां जरं पेटूनी का उठल्यां, 
करेलं क्षणी काही अजबं हां ईश्वरी खेळं सारां, 
मर्म जाणिले जयाने जन्माचे भव्यं सारं, 
कर्तव्यें करण्यां सदैवं दंग जीव माझा. 

वाटेवरी जरी कुणीही पत्थरं का भरले, 
क्षणातं भस्मं होतीलं ते एका तीव्रं इच्छेने! 
महत्वाकांक्षां आहे का माझी इतकी क्षुल्लकं? 
कि देइनं तयांना आसरां जे मज पाडण्या चतुरं.

रक्षिण्यासं मज सतत हे दैवी तेजं असतां, 
कुणा होईलं बुद्धि माझां घातं करण्याची, 
जो जो करिलं असे धाडसं प्रक्षुब्ध क्रौर्याचे, 
क्षणातं होइल फिके तयाचे आत्मतेजं पहां!

विराटं वादळें जरी कां उठली योग्यं कर्म कार्यात, 
एकाएकी फूंकूनी उधळवीणं पवनाची गर्वसत्तां! 
संघर्ष करितं राहिन आयूष्यें अंत जरी का आलां, 
यमदूतासं परतवीणं..सांगेनं कार्य संपले न आत्तां.

- प प्र आचरेकर 

No comments:

Post a Comment