11 February 2009

प्रेमातं पडला एक जीवं

प्रेमातं पडला एक जीवं

प्रेमातं पडला एक जीवं

काय सांगू त्यासी आला चेवं!

मग झाला एकदम तय्यार

पूसण्यासी तिजला अपूले भावं

 

काय सांगू? काय होता राव?

चिंतितसे आत्ता कधी जावं

धैर्यची न होइ पूसण्याचे

झाला विचार पत्र लिहावं

 

मग घेवोनी संगे कागदराव

प्रारंभ केला शब्दभावं

क्रोधानं चुरगुनी ती पाने

म्हणे आठवे नच मज तीचे नावं-गावं!’

 

सरते उरीयला एक पर्याय

जावे छाती पुढे काढोन

सांगावे तिस तूजवर

आहे गं माझे अतिव प्रेम

 

ठरीयला दिनं बुधवार

उठीयलां पहाटे वाजले चारं

तिर्थरुप पूसिता खास काय?’

सांगे त्यांसी गुरूजींचे नावं!

 

लागेल का हो अपुला निभाव!

उठिला गेला बसथांब्यावरं

दोन तास उलटोनी गेले

तोच दिसली पण संगे जवान

 

भाव कि यार जाने कौन?’

पण होता भारी पेहलवानं

होती हो भारी तयाची चालं

दिसायला तर एकदम रूबाबदारं

 

राव अमुचा माने सुकडा बोंबील

कि दोन ठोशांत आडवा पडिलं!

त्याचा पाहोनी रूबाबं राव

विसरोनी गेला सर्व  प्रेमभावं

 

म्हणोनी सांगितो तरुणराव

काही गोष्टी हिताच्या फार

प्रेमातं जर का पडावे यारं

वाढवा अपुले शरीरसौंष्ठवं

 

मिळवावा भरपूर विद्यानूभवं

कमावावे जिंदगी अपुलाले धनं  

मग करोनी जनतेतं भारी हो वट

दाखवोनी द्यावां अपुला हा भावं

 

मग तुम्हां मागोनी धावतीलं

पहा पोरींचे ऐसे झुंड हजार!

           - . प्र. आचरेकर...

 

No comments:

Post a Comment