21 January 2009

आंम्ही मराठी

आंम्ही मराठी

आंम्ही मराठी

वाघाचे बच्चे आंम्ही

सूर्याचे तेज आंम्ही

न्यायाचे कवच आंम्ही

ध्येय्याचे धडे आंम्ही

शौर्याची गाथां आंम्ही

खड्गाची धारं आंम्ही

संस्कृती जपतो आंम्ही

हिंदूचे वंशज आंम्ही

स्वराज्य रक्षक आंम्ही

मातृभुमीचे प्रेम आंम्ही

सिंहाची गर्जना आंम्ही

प्रतिभावंत आंम्ही आंम्ही

विचारवंत आंम्ही

प्रेमाचे पुजक आंम्ही

सहिष्णू विचारं आंम्ही

विद्येची खाण आंम्ही

लोकांचे सेवक आंम्ही

आणि म्हणूनचं

दिल्लीचे तख्तं आंम्ही

देशाचे राजे आंम्ही

           - . प्र. आचरेकर...

12 January 2009

संघर्ष


संघर्ष

दिवस येतो अन् जातो  

काळजाचे ठोके वाढवितो

अपूले भवितव्यं काय?

या प्रश्नी आयुष्यं वेचतो

 

जो वर्तमानी लढतो

भविष्यकाळी अमरच होतो

जगतो न वाकता केवळ लढतो

शेवटी जिंकतो जिंकतो अन् जिंकतो

 

जो विचारचं करतो

वर्तमानं शून्यं करतो

अशक्याचा सूर लावतो

शेवटी हरतो हरतो अन् हरतो

 

जो प्रसंगावरं मातं करतो

अपुली शक्ती सततं वाढवितो

व्यक्तिमत्वं प्रभावशाली करतो

सुखी जिवन जगतो

 

जो भविष्यासं भीतो

नकारार्थी जिवन जगतो

आयुष्याची सत्यानाशी करतो

जिवन दुःखातचं वेचतो

 

जो आयुष्यात झूंजतो

इच्छाशक्ती बळं वाढवितो

प्रचंड पाठबळ मिळवितो

संपूर्ण जिवनमान यशस्वी करतो

                 - प प्र आचरेकर   

बाजारची वाटं

बाजारची वाटं

प्रातःकाल

सुर्य प्रकाशमानं

शितल छायां

तुळशी वृंदावनं

शांततेचा पायां

सुंदर निर्मळ कायां

ईश्वरं प्रार्थनां

तेजस्वी विचारधारां

पक्षी सोयरें

स्वतंत्र फुलपाखरे

निर्मळ वातावरणं

स्मरणीयं अनूभवं

नदी संत आहे

विचार शुद्ध आहे

समुद्रं शूरं आहे

जीव आंत पोहतो आहे

नाविक झूंजत आहे

जाळे आंत टाकीतं आहे

जीवं आंत झूंजतो आहे

जीवं आंत झूंजतो आहे

पोटासं काय आहे

पैशास ऊब आहे

दिवाणा किनाराच आहे

बाजारची वाटं पाहतो आहे

बाजारची वाटं पाहतो आहे

      - प. प्र. आचरेकर

व्यसन

व्यसन

प्रतिमा कलंकित झाली

चारित्र्य कलंकित झाले

अहो मी पाप केले, पाप केले

होत्याचे नव्हते झाले

जिवनाशी बंड केले

मद्य प्राशनाचे नूसते पेले

अहो माझे शरीरही झिजले

घर घरपणातून गेले

मुलांचे शिक्षणही संपले

बाटली बाटली अन् बाटली

नूसते घोट पोटी गेले

रक्त अशुद्ध झाले

आतडे खराब झाले

तरी समाधान नाही झाले

हिनं माझे काळीजही फाळले

फुलासारख्या पोरांस बाहेर काढले

आयुष्य पाप नूसते वेचतचं गेले

जिवन कर्जबाजारी झाले

मन बेचिराख झाले

शेवटी बाकोसही मारिले

व घराबाहेर काढले

तरिही घोट गिळतचं गेले

मी माझे मनही चिरले

येतां जातां शिव्याशापं खाल्ले

माणसातून हे आयुष्य उठले

सर्व आणि सर्वचं गेले

व्यसन नाशास कारण जाहले

        -प. प्र. आचरेकर

11 January 2009

दिशा

दिशा

दिशा खडबडून उठल्यां

थोडक्यात अंधः कार झाला

या नव्या मूलांच्या दिशा सुन्न झाल्या

यांस नाहि कळले काळाचे हे भान

वाट भरकटली रस्ता झालां शेणं

उगाच वाईट वाचा सूटले व

थोरां मोठ्यांचा मान राखण्यासं विसरलें

या नव्या युगानं त्यांना फारच छळले

चांगल्या मार्गावर हातून असंख्य चूका जाहल्या

दुःखानं मनाच्या जखमा खोलवर फाळल्या

उगाच लाठी घेऊनी ऊठलें व

स्वतःच कोठडित जावोन बैसले

श्रिमंतांनी गरिबांस छळलें

नोकरीसाठी वनवन भटकलें

शेवटी उदरासाठी दरोडे घातलें

अपुल्याच पायावर आपणच पत्थर ओतले,

इच्छेचे द्वारहीं बंद जाहलें व

नकळतं चूकाच चूका करीत सूटले

थोडक्यातं अंधःकार झाला

या नव्या मुलांच्या दिशा सून्न झाल्या

या नव्या मुलांच्या दिशा सून्न झाल्या

                    - प. प्र. आचरेकर

10 January 2009

दादागिरी

दादागिरी

दादागिरीनं पहुडलेला समाज,

इथं दादागिरी तिथं दादागिरी,

समंजसपणाचं सांडलेलं रक्त,

नितिमत्ता झाली शुन्यातं शुंन्य,

जो तो हाती घेइं,

केवळं आणि केवळं लाठी काठी,

असंख्य शत्रूत्वे निर्माण करितीं,

तरी समाधानी अखंडि,

असे कसे हो यांचे निर्दयी मनं,

समाजमानसाचां नाहिं विचार,

आचारातीलं विक्षिप्तपणाचां पोतं,

जनताहैराण उडाली झोप,

जिकडेतिकडे स्वैराचार अपार,

सर्वच समाज भ्रष्टाचारानं बेजार,

न्यायतत्वाची राखरांगोळी,

अधिकार कर्तव्यं,

आळिमिळी गुपचिळी,

कुणास नाहिं कुणाची खंत,

षंढपणाचा झाला उद्रेकं,

जिथं तिथं दादागिरीचचं राज्यं,

आहे का हो यासं काहीं अर्थं,

सर्वच अनर्थं अनर्थ,

आत्तातरी आणा टाळकिं ठिकाणावरं,

नाहिंतर धर्मावर अधर्माचं आक्रमण,

सहन करालं कुठवरं कुठवरं....

           -   प. प्र. आचरेकर