12 January 2009

व्यसन

व्यसन

प्रतिमा कलंकित झाली

चारित्र्य कलंकित झाले

अहो मी पाप केले, पाप केले

होत्याचे नव्हते झाले

जिवनाशी बंड केले

मद्य प्राशनाचे नूसते पेले

अहो माझे शरीरही झिजले

घर घरपणातून गेले

मुलांचे शिक्षणही संपले

बाटली बाटली अन् बाटली

नूसते घोट पोटी गेले

रक्त अशुद्ध झाले

आतडे खराब झाले

तरी समाधान नाही झाले

हिनं माझे काळीजही फाळले

फुलासारख्या पोरांस बाहेर काढले

आयुष्य पाप नूसते वेचतचं गेले

जिवन कर्जबाजारी झाले

मन बेचिराख झाले

शेवटी बाकोसही मारिले

व घराबाहेर काढले

तरिही घोट गिळतचं गेले

मी माझे मनही चिरले

येतां जातां शिव्याशापं खाल्ले

माणसातून हे आयुष्य उठले

सर्व आणि सर्वचं गेले

व्यसन नाशास कारण जाहले

        -प. प्र. आचरेकर

No comments:

Post a Comment