संघर्ष
दिवस येतो अन् जातो
काळजाचे ठोके वाढवितो
अपूले भवितव्यं काय?
या प्रश्नी आयुष्यं वेचतो
जो वर्तमानी लढतो
भविष्यकाळी अमरच होतो
जगतो न वाकता केवळ लढतो
शेवटी जिंकतो जिंकतो अन् जिंकतो
जो विचारचं करतो
वर्तमानं शून्यं करतो
अशक्याचा सूर लावतो
शेवटी हरतो हरतो अन् हरतो
जो प्रसंगावरं मातं करतो
अपुली शक्ती सततं वाढवितो
व्यक्तिमत्वं प्रभावशाली करतो
सुखी जिवन जगतो
जो भविष्यासं भीतो
नकारार्थी जिवन जगतो
आयुष्याची सत्यानाशी करतो
जिवन दुःखातचं वेचतो
जो आयुष्यात झूंजतो
इच्छाशक्ती बळं वाढवितो
प्रचंड पाठबळ मिळवितो
संपूर्ण जिवनमान यशस्वी करतो
- प प्र आचरेकर
No comments:
Post a Comment