10 January 2009

दादागिरी

दादागिरी

दादागिरीनं पहुडलेला समाज,

इथं दादागिरी तिथं दादागिरी,

समंजसपणाचं सांडलेलं रक्त,

नितिमत्ता झाली शुन्यातं शुंन्य,

जो तो हाती घेइं,

केवळं आणि केवळं लाठी काठी,

असंख्य शत्रूत्वे निर्माण करितीं,

तरी समाधानी अखंडि,

असे कसे हो यांचे निर्दयी मनं,

समाजमानसाचां नाहिं विचार,

आचारातीलं विक्षिप्तपणाचां पोतं,

जनताहैराण उडाली झोप,

जिकडेतिकडे स्वैराचार अपार,

सर्वच समाज भ्रष्टाचारानं बेजार,

न्यायतत्वाची राखरांगोळी,

अधिकार कर्तव्यं,

आळिमिळी गुपचिळी,

कुणास नाहिं कुणाची खंत,

षंढपणाचा झाला उद्रेकं,

जिथं तिथं दादागिरीचचं राज्यं,

आहे का हो यासं काहीं अर्थं,

सर्वच अनर्थं अनर्थ,

आत्तातरी आणा टाळकिं ठिकाणावरं,

नाहिंतर धर्मावर अधर्माचं आक्रमण,

सहन करालं कुठवरं कुठवरं....

           -   प. प्र. आचरेकर

No comments:

Post a Comment