17 February 2009

आंम्हास काय हवे?

 

आंम्हास काय हवे?

 

आंम्हास काय हवे?

लाकूड विटां वगैरे

आधारासं एक छप्परं

वर्षाकाली पत्रे अन्

झाकण्यासी डांबर

 

आंम्हासी नसतो पत्ता

अमुच्याचं भविष्याचां

शाळेवीना लहान पोरं

दिनरातं उनाडक्यां

 

झाले काळेकुट्ट जिवन

अंधारात सर्व दिशां

कामं कोणतेही असो

द्या केवळ एक पैसां

 

आंम्हास काय हवे?

दाणे रेशनिंगचे अन्

ज्वलनासी घासलेटं

प्रातःकाली डब्बें

उघड्यावरी बैसण्यासं

 

काय अमुची संस्कृती?

या पहावयासी जरा

दारू जुगाराचे अड्डे

टपोरी पोरांचा पहारां

 

अन्न पाण्याचा हो

आहे सदाचं जुगारं

दिडदमडीचा हा जीवं

आहे कामांस लाचारं

 

आंम्हास काय हवे?

काम तूटके फुटकें

गिळण्यासी एक घासं

कधी उष्ट्याचाही भातं

रात्रीच्या भोजनासं

 

काही अमुच्यांतलेच असती

जरा आंम्हाहूनी भिन्नं

काबाडकष्टं करोनी

मिळाविती मोठी चिन्हं

 

पण हवा जेव्हा लागे

ते आंम्हा विसरोनी जाती

अमीरांचे हृद्यंशुन्यं

सदा गुण हो गाती

 

आंम्हास काय हवे?

सहकार्य वगैरे

परंतू पैका नको

हव्यात काही संघटना

अमुचे प्रश्नं उचलण्यासं  

-       प. प्र. आचरेकर   

सुंदर तारांगण

सुंदर तारांगण

 

नभी या सजले, रात्रीस पहा, किती सुंदर तारांगण

नेत्र पाहूनी, दिपूनी जाती, ग्रह तार्‍यांचे प्रांगण

 

शुक्र तेजस्वी नभाची

वाढवे विलासी शोभा

मंगळ गगनी विराजूनी

गाजवे क्रोधाचा गाभा

 

शनी भोवती कडे सांगे

मी रक्षण करण्यासी थोरं

चंद्र जणू  दुग्ध प्राशूनी

भासे पृथ्वीचे लहानगे पोरं

 

गुरू सतर्क तत्परं आहे

समतोलं राखण्या तत्वांचा

बुध हा लहान असुनी

सांगे मी आहे तिक्ष्ण बुद्धीचा

 

नक्षत्रे तेजस्वी तारकांची ह्या

सांगती दिशाभानं लोकांना

हर्षलं शेवटी लपूनी

सांगे गुप्तं गोष्टी सर्वांना

 

धुमकेतूही दौडतं आहे

झाला क्रोधानं व्याकुळं

कधी कधी तरं मध्येचं  

असतो उल्कांचा धुमाकुळं

 

ध्रुवं उत्तरे विराजूनी सांगे

भक्तीचे तत्वज्ञानं

तारे सर्वची नभी मंडपी

जणू सभाचं भरली छानं

 

हे सर्व पाहूनी, इतुका काही, मी गेलो हो दंगुनं

नभी या सजले, रात्रीस पहा, किती सुंदर तारांगण

           

- प. प्र. आचरेकर   

11 February 2009

स्फुर्ती


स्फुर्ती
आहे असाचं मी, 
आहे जसां मी, 

माझ्यां प्रतिभेच्यां ज्वालां जरं पेटूनी का उठल्यां, 
करेलं क्षणी काही अजबं हां ईश्वरी खेळं सारां, 
मर्म जाणिले जयाने जन्माचे भव्यं सारं, 
कर्तव्यें करण्यां सदैवं दंग जीव माझा. 

वाटेवरी जरी कुणीही पत्थरं का भरले, 
क्षणातं भस्मं होतीलं ते एका तीव्रं इच्छेने! 
महत्वाकांक्षां आहे का माझी इतकी क्षुल्लकं? 
कि देइनं तयांना आसरां जे मज पाडण्या चतुरं.

रक्षिण्यासं मज सतत हे दैवी तेजं असतां, 
कुणा होईलं बुद्धि माझां घातं करण्याची, 
जो जो करिलं असे धाडसं प्रक्षुब्ध क्रौर्याचे, 
क्षणातं होइल फिके तयाचे आत्मतेजं पहां!

विराटं वादळें जरी कां उठली योग्यं कर्म कार्यात, 
एकाएकी फूंकूनी उधळवीणं पवनाची गर्वसत्तां! 
संघर्ष करितं राहिन आयूष्यें अंत जरी का आलां, 
यमदूतासं परतवीणं..सांगेनं कार्य संपले न आत्तां.

- प प्र आचरेकर 

प्रेमातं पडला एक जीवं

प्रेमातं पडला एक जीवं

प्रेमातं पडला एक जीवं

काय सांगू त्यासी आला चेवं!

मग झाला एकदम तय्यार

पूसण्यासी तिजला अपूले भावं

 

काय सांगू? काय होता राव?

चिंतितसे आत्ता कधी जावं

धैर्यची न होइ पूसण्याचे

झाला विचार पत्र लिहावं

 

मग घेवोनी संगे कागदराव

प्रारंभ केला शब्दभावं

क्रोधानं चुरगुनी ती पाने

म्हणे आठवे नच मज तीचे नावं-गावं!’

 

सरते उरीयला एक पर्याय

जावे छाती पुढे काढोन

सांगावे तिस तूजवर

आहे गं माझे अतिव प्रेम

 

ठरीयला दिनं बुधवार

उठीयलां पहाटे वाजले चारं

तिर्थरुप पूसिता खास काय?’

सांगे त्यांसी गुरूजींचे नावं!

 

लागेल का हो अपुला निभाव!

उठिला गेला बसथांब्यावरं

दोन तास उलटोनी गेले

तोच दिसली पण संगे जवान

 

भाव कि यार जाने कौन?’

पण होता भारी पेहलवानं

होती हो भारी तयाची चालं

दिसायला तर एकदम रूबाबदारं

 

राव अमुचा माने सुकडा बोंबील

कि दोन ठोशांत आडवा पडिलं!

त्याचा पाहोनी रूबाबं राव

विसरोनी गेला सर्व  प्रेमभावं

 

म्हणोनी सांगितो तरुणराव

काही गोष्टी हिताच्या फार

प्रेमातं जर का पडावे यारं

वाढवा अपुले शरीरसौंष्ठवं

 

मिळवावा भरपूर विद्यानूभवं

कमावावे जिंदगी अपुलाले धनं  

मग करोनी जनतेतं भारी हो वट

दाखवोनी द्यावां अपुला हा भावं

 

मग तुम्हां मागोनी धावतीलं

पहा पोरींचे ऐसे झुंड हजार!

           - . प्र. आचरेकर...

 

04 February 2009

विशालं हा सागरं

विशालं हा  सागरं

आहे विशालं हा  सागरं

सर्व दिशांत  निळाशारं

प्रेमं वाळूवरीं  फारं

लाटांचे आलिंगन  सुंदरं

खडकावरी फेसाळं  प्रहारं

देहावरं सिंचनं  तुषारं

यांस भेटावे  वारंवारं

करावा नेहमीं  सत्कारं

देखणी नावं  डोक्यावरं

समुद्रीजीवं  स्वैराचारं

समुद्र आहे हा  सुंदर 

आंत मनूष्ये कहरं

कारखान्यांचे  सांडपाणी

काळा होतोयं सागरं

आहे विशाल हा सागर

मानवी मनं नाही  विशाल

ओततो नेहमी जहरं

ओततो नेहमी जहरं

              - . प्र. आचरेकर...

 

 

पृथ्वीच्या मोलास जागृक रहा

पृथ्वीच्या मोलास  जागृक रहा

मन ओजस्वी - तेजस्वी करां

पृथ्वीच्या मोलास  जागृक रहा

 

विक्षिप्तं  प्रवृत्तीचं न बनो

प्रेमसागराचां  भवसागरं घडो

रक्ताच्यां  चिळकांड्या न कधी उडो

 

शुभ्रं रंगारंग  बावटां फडफडों सदां

पृथ्वीच्या मोलास  जागृक रहा

 

 

केरकचरां न  सर्वत्रं उडो

अशुद्ध वायूंचा  योग्य तो निचरा होवो

रोगराइंचा सर्वत्र  नायनाट होवो

 

प्राणिमात्रं  रक्षिण्यां कर्तव्यं थोरं पहां

पृथ्वीच्या मोलास  जागृक रहा

 

 

प्रचंड  इच्छाशक्तीचा प्रभावं

होईल अशुद्धं  शक्तीचा अभाव

गोरगरीबांचा होईल  हा उद्धारं

 

विश्वं रक्षिण्यां  सर्वकाळ तत्परं रहां

पृथ्वीच्या मोलास  जागृक रहा 

 

कुणासं न राहो  पैकाची अती हावं

सत्त्याच्या  विजयास होऊ द्या चिरफाडं

क्रुरतेच्या  ज्वाळां शांतीतेजानं गाडं

 

जयोत्सू होवो सत सर्वत्रं निर्भिडं रहा

पृथ्वीच्या मोलास  जागृक रहा

                      - . प्र. आचरेकर...

 

 

जिवन

जिवन

संघर्ष असावा  जिवनाच्यां प्रत्येकं समयासं

व्यक्तिमत्त्वं  घडतं असते या एकां सवयीतं

 

झुंजार असावे जिवन सर्व प्रत्येकं क्षणासं

ताकद वाढतं असते या एका सवयीतं

 

शत्रुत्व असावे  जिवनाच्या प्रत्येकं ठोक्यासं  

मित्रत्वं तेवतं  राहते असंख्यं यूद्धें पेलण्यासं

 

प्रेमही असावे  जिवनाच्यां सर्व प्रवासातं

मानवतां फोफावतं  असते वाईट वृत्त्यां मोडण्यासं

 

विश्वं सर्वं  पहावे सर्वं दिशा पडताळूनं

बुद्धिं  प्रज्वलितं होते केवळ जागृक राहण्यासं

 

खंबीर असावां  जिवनाचा प्रत्येक प्रवासं

केवळ आयुष्यातीलं  असंख्यं वादळे झेलण्यासं

                                         - प प्र आचरेकर